मेष – दीर्घ संघर्षानंतर आज तुम्हाला काही समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. हळूहळू नशिबाची चांगली साथ तुम्हाला लाभेल. आज वाढत्या आर्थिक समस्यांपासूनही तुम्हाला मुक्ती मिळू शकते. काही कारणास्तव आज दूरच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. लहानमोठ्या पार्ट टाईम कामासाठी वेळ काढणेही आज शक्य होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाकांक्षा पुर्तीचा आहे त्यामुळे प्रयत्न करत राहा.
वृषभ – आज आपल्या कुटुंबात एखाद्या मंगलकार्याच्या आयोजनाविषयी चर्चा घडून येईल. तुमचा जीवनस्तर सुधारण्यासाठी सध्या उपयुक्त असणाऱ्या वस्तूंचीच खरेदी करणे फायद्याचे ठरेल. संध्याकाळी विशेष अतिथींचे आगमन होऊ शकते. त्यामुळे मन प्रसन्न होईल. सासरच्या माणसांकडून संपत्ती संबंधित भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन – तुमच्यासाठी आजचा दिवस जलद प्रगतीचा ठरेल. तुमच्या या प्रगतीकडे पाहून सर्व व्यक्ती आश्चर्यचकित होतील. इतकेच नाही तर तुमच्या यशाला तुमचीच नजर लागण्याचीही शक्यता आहे. आपल्या यशाची गती कायम राखणे हेच तुमचे उद्दिष्ट असायला हवे अन्यथा पुढील काळात तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. अनावश्यक मानसन्मानाच्या कामापासून दूर राहणे फायद्याचे ठरेल. बेजबाबदारपणा टाळण्यासाठी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.
कर्क – आज आपल्या भावंडांशी संबंधित समस्यांमुळे तुम्ही चिंतेत राहाल. कुटुंबातील सर्व सदस्यांची सहमती असल्यास जागा बदलण्याचा विचार करू शकता. कामाच्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागेल.
सिंह – आज व्यावसायिक समस्या तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनतील कारण मागील काही काळापासून व्यवसायात अनियमितता पाहायला मिळत आहे. ही अस्थिरता पुढे अजून काही काळ सुरू राहील. जर नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला पूर्ण सुधारणा करायची असेल तर त्यासाठी आळस आणि आरामाचा त्याग करणे अतिशय गरजेचे आहे. आज आपल्या कामावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे.
कन्या – आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त धावपळ करावी लागेल. परंतु या मेहनतीमुळे तुम्हाला लाभदायक परीणामही पाहायला मिळतील. त्यामुळे आपली कामे उत्साहाने पूर्ण करा. कारण येणाऱ्या काळात तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनाही आज लाभ मिळण्याची शक्यता आहे.
तूळ – आज तुम्ही काही कारण नसतानाही चिंतेत राहाल. आज काही वास्तविक समस्या निर्माण होतीलच पण काही समस्या मात्र दूरदृष्टीच्या अभावामुळे तुम्हीच निर्माण कराल. सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात विरोधकांना तोंड द्यावे लागेल. आपली बुद्धी आणि साहसाच्या बळावरच तुम्ही या विरोधकांचा सामना करू शकाल. मनाची दुर्बलता आणि दुर्गुण यांचा त्याग करा.
वृश्चिक – आज अचानक एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी वाढलेल्या ताणाचा स्वतःवर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. एखादी नवी योजना आज यशस्वी होऊ शकते. जुन्या वादविवादांपासून सुटका होईल. अधिकारी वर्गात सामंजस्य वाढेल. निराशाजनक विचार मनात येऊ देऊ नका. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.
धनू – आज तुम्हाला एखाद्या नव्या संपर्कातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. गतकाळाच्या संदर्भात एखादी नवीन संधीही मिळू शकते. अत्यंत कष्टाने अडकलेले पैसे परत मिळवता येतील. दैनंदिन कामात आळस करू नका. व्यावसायिक प्रगतीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. रात्रीच्या वेळी मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
मकर – आज सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. ग्रहस्थिती तुमच्या भाग्य विकासासाठी अनुकूल आहे. खरेदीविक्रीच्या व्यापारात लाभ होईल. दिवसभर चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. मित्रपरिवारात हास्यविनोदाने वातावरण प्रसन्न राहील. अनावश्यक त्रासापासून लांब राहा. धार्मिक पर्यटनाची योजना बनू शकते. मामाकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ – आज दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घनिष्ठ संबंधातून लाभ मिळवण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील.आयात-निर्यातीच्या व्यापाराची सुरुवात करण्याचा निर्णय आज घेतला जाऊ शकतो. धार्मिक व आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवास आणि मंगलकार्य दोन्हीचे योग बनत आहेत. वेळेच्या सदुपयोगामुळे तुम्हाला लाभ मिळेल. कुटुंबात वेळ मजेत जाईल.
मीन – आज अध्ययन आणि आध्यात्म दोन्ही क्षेत्रात रुची निर्माण होईल. विवादास्पद प्रकरणे मिटतील. गुप्त शत्रू आणि ईर्ष्या बाळगणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा.आज कोणालाही पैसे उधार देणे टाळा अन्यता ते परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे.आईवडील,गुरू यांची सेवा आणि देवपूजा यात रस घ्या.






