राष्ट्रीय महामार्ग क्र.7 हिंगणघाट तालुक्यातील पोहना रोडवर खड्ड्यांचे वाढते साम्राज्य

हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरेशी) : हिंगणघाट तालुकामध्ये येत असले पिपरी बोपापुर पोहणा या गावी राष्ट्रीय महामार्ग क्र.7 पोहणा येरला येथे उड्डाण पुल देण्यात आला. या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहे, गेल्या ८ महीन्यांमध्ये याच पुलावर बरेच अपघात झाले आहे.

या रोडचे काम मारुती कंपनीकडे होते, 1 ते 2 वर्षा मध्ये या रोडचे काम हलक्या दर्जाचे झाले आहे. कोरोनाचे संकट देशावर आहे, सगळी कडे बंद असल्यामुळे वाहतुक कमी झाली आहे. 24 तास सुरु असणारा हा राष्ट्रीय महामार्ग क्र.7 वर दळण वळण जास्त असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले .परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग नेहमी प्रमाणे सुरु होईल,या रोडवर जास्त अपघात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले.

पोहना या ठिकाणी 1 ट्रक रस्ताचे खड्डे असल्यामुळे नियंत्रण सुटून उड्डाणपुलाच्या खाली कोसळला होता. यात एकाला आपला जीव गमावला लागला. तरी या रोडकडे दुर्लक्ष असल्यामुळे प्रशासन लवकरात लवकर रोडचे खड्डे बुजवावे, अशी मागणी नागरिक करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here