जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात

जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात शानदार उद्‌घाटन समारंभात मेरी कोम आणि मनप्रीतनं केलं भारतीय पथकाचं नेतृत्व

टोकियो : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एक वर्षासाठी तहकूब करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचे शुक्रवारी अतिशय दिमाखात करण्यात आले. टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी २१ व्या क्रमांकावर उतरली. यात २२ खेळाडू आणि ६ अधिकारी सहभागी झाले. या मार्चपास्टमध्ये ग्रीकचा पहिला क्रमांक होता.

सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. भारतीय पथकाच्या प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी टाळ्या वाजवून संघाला प्रोत्साहन दिले. १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यीय पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आले आहे.

ऑलिम्पिकमध्ये प्रथमच ‘eSwatini’ देशातील खेळाडूंनी ऑलिम्पिक सोहळ्यात भाग घेतला. वास्तविक हा नवीन देश नाही. दक्षिण आफ्रिका स्थित स्वाझीलँड देशाचे हे नवीन नाव आहे. हे नवीन नाव २०१८मध्ये स्वीकारले गेले.

कोरोनामुळे ऑलिम्पिकमध्ये बरेच मोठे बदल पाहायला मिळतील. खेळाडूंना या विषाणूच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी एक अतिशय कठोर बायो बबल तयार केला गेला आहे. टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांशिवाय रंगणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे खेळाडूंना दररोज १९ चाचणींमधून जावे लागेल. या चाचणीच्या अहवालाशिवाय कोणत्याही खेळाडूला मैदानावर प्रवेश मिळणार नाही. इतकेच नव्हे, तर एखाद्या खेळाडूने अंतिम फेरी गाठली असेल आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर त्याला पदकाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here