शिवसेना-युवासेना व जय आदिवासी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईच्यात जागतिक आदिवासी दिवस साजरा
दोंडाईचा (प्रतिनिधी) : जल, जंगल, जमीनीचे खरे वारस आदिवासी बांधव आहे. हे जगाने देखील मान्य केले आहे. आदिवासी बांधवांच्या सन्मानार्थ जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येतो, असे मत युवासेनेचे तालुकाप्रमुख आकाश कोळी यांनी येथे व्यक्त केले.
दोंडाईचा शहरात शिवसेना-युवासेना व जय आदिवासी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवमोगरा माता, भगवान वीर एकलव्य, आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मनोगत व्यक्त करतांना श्री. कोळी म्हणाले की, संपूर्ण जगभर 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. युनायटेड स्टेसने त्याला मान्यता दिली आहे. आदिवासींचा इतिहास हा जाज्वल्य असून भारताच्या इतिहासात, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी बांधवांचे योगदान हे अमुल्य आहे, असेही श्री.कोळी म्हणाले. यानंतर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार यांनी देखील आदिवासी बांधवांना शुभेच्छा देत एकजुट होऊन संघटीत राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्रम अहिरे, कैलास मालचे, संदीप तिरमले, गणेश ठाकरे, पिंटु मोरे, जितु मालचे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन युवासेना शहरप्रमुख सागर पवार यांनी तर आभार उपशहरप्रमुख योगेश बोरसे यांनी मानले. याप्रसंगी शिवसेनेचे शहर संघटक राजेश रुपचंदाणी, उपशहरप्रमुख आबा चित्ते, विजय वाडीले, चुडामण बोरसे, युवासेनेचे उपशहरप्रमुख गणेश विसावे, सुरेश कोळी, राकेश पाटील, भुषण चौधरी, विभागप्रमुख किरण कोळी, नरेंद्र धात्रक, ज्ञानेश्वर पवार, युवासेना शाखाप्रमुख पप्पु धनगर, भैय्या लोणारी, देवेंद्र अहिरे, निलेश विसावे आदी उपस्थित होते.



