पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : झेड व्ही एम यूनानी मेडिकल कॉलेज आणि जमियत उलेमा हिंद या संस्थाच्या वतीने चिपळूण येथे पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तीन दिवस चाललेल्या या उपचार शिबिरात 2 हजार हून अधिक पुरग्रस्तांवर उपचार करण्यात आले. जलील अहमद, डॉ गजाला मुल्ला, डॉ मंझूर अहमद ,डॉ झोएब खान ,वासिम पठाण ,तबस्सुम पठाण ,मुबारक शेख ,जमियत उलेमा हिंदचे पुणे शहर अध्यक्ष कारी इद्रीस,सचिव युसुफ जकाती इत्यादी सहभागी झाले.
चिपळूणमधील तीन ठिकाणी हे शिबिर घेण्यात आले. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार तसेच महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्ष आबेदा इनामदार यांनी वैद्यकीय टीमचे अभिनंदन केले






