जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : जळगाव येथिल रिंग रोड वरील महेश प्रगती हॉल येथे काल दि.15 ऑगस्ट रोजी 75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त माहेश्वरी सखी मंडळ जळगाव यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रश्नमंजूषा तसेच विविध खेळ, डान्स,मिमिक्री कार्यक्रम उत्साहात पार पडले.
तिज निमित्त कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांनी झोके खेळून मनसोक्त आनंद लुटला.कार्यक्रमात घेतल्या गेलेल्या स्पर्धेत विजेते सौ.चित्रलेखा मालपाणी,सौ.ज्योती जेथल,सौ.मनीषा मणियार,सौ.सुरेखा झंवर,व सुवर्णा नवाल यांना विविध बक्षिसे देण्यात आली.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माहेश्वरी सखी मंडळा तर्फे करण्यात आले.






