दोंडाईचा येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस काळे फासले; पदाधिकाऱ्यांना केली अटक व सुटका

दोडाईचा (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. याचा प्रत्यय शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथे आज मंगळवार दुपारी बारा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पहायला मिळाला.

शहरातील शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस शाई फेक करत जोड्या मारत आंदोलन करून घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी पोलीस निरिक्षक दुर्गेश तिवारी, उपनिरीक्षक सचिन गायकवाड, देविदास पाटील आदींनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

या आंदोलन प्रसंगी शिवसेनेचे विभागीय तालुका प्रमुख ईश्वर पाटील, युवा सेना तालुका प्रमुख आकाश कोळी, उप तालुका प्रमुख शैलेश सोनार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामभाऊ माणिक, राका शेठ, आबा चित्ते, किरण साळवे, राज ढोले, विजय वाडिले, सागर पवार, चुडामण बोरसे, सुरेश कोळी, लखन मराठे, देवेंद्र अहिरे, किरण कोळी, योगेश बोरसे आदी शिवसैनिक उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here