एम.ए. एम.सी.जे. प्रवेश प्रक्रिया सुरु : जनसंवाद आणि पत्रकारिता क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : के.सी.ई.सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात एम.ए. एम. सी.जे अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला प्रवेश देणे सुरु आहे. युजीसी नेट- सेट पॅटर्न नूसार पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमांची पुर्नरचना व रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित करण्यात आला आहे.

वृत्तपत्र,इलेक्ट्रॉनिक मीडिया, जनसंपर्क, जाहिरात, न्यू मीडिया, आकाशवाणी,जनसंपर्क कार्यालये, कॉर्पोरेट उद्योग, वृत्तपत्रे, एफ.एम.रेडिओ, सोशल मीडिया,फिल्म मेकिंग आदि क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी उपलब्ध आहे

एम.ए. एम.सी.जे. अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी विभागात नावनोंदणी सुरु आहे. सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर या अभ्यासक्रमाला पात्र असेल. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. संदीप केदार ,मो. 8600070099 प्रा. केतकी सोनार मो. 8830743168 यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here