काया सुदंर न माया सुंदर-जिसका मन सुदंर उसका जग सुदंर…
मुलगी,बहीण, सुन, पत्नी, आई,सासू,आजी म्हणून कोणालाही न दुखावता आयुष्य काढणे,यालाच कंप्लीट जीवन जगणे म्हणतात…
बहोत याद आते है वो लोग जो बीच राह में अकेला छोड़ जाते है–मा.नगराध्यक्ष श्री रमेशदादा कुकरेजा…
पृथ्वीतलावरील ह्या जगात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात देवाने स्री हा घटक जोडून दिला आहे. थोडक्यात आपल्याला असे म्हणता येईल की, कोणत्याही माणसाचे आयुष्य स्री शिवाय कंप्लीट, पुर्ण होऊ शकत नाही. त्यातही प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात येणारी स्री सुख देवूनच जाईल हे ही सांगता येत नाही. मग ती स्री आयुष्यात जन्म देणारी आई असो,बहीण असो,पत्नी असो, मुलगी असो,नात असो,असे कोणतेही नाते असू शकते.मात्र फक्त एखादी स्री अपार मेहनतीतुन जेव्हा घरातील माणसांसोबत हे सर्व नात पाळत असताना. कोणाचेही मन न दुखवता संसार करते. तसेच सर्व ठिकाणी म्हणजे माहेर ते सासर पासुन,मित्रपरिवार, समाजात, मुला-मुलींच्या संसारात फक्त प्रेम न प्रेम पेरते. तेव्हा अशा व्यक्तीच्या अचानक जाण्याने,जीवन जगताना मध्येच एक्झीट घेतली तर अशी व्यक्ती प्रत्येकाच्या मनात घर करत, कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून जाते आणि ह्या खालीपण-पोकळीचा त्रास कोणाला अधिक होतो.तर खासकरून ती व्यक्ती म्हणजे ज्याच्यासोबत ह्या स्रीने सुख-दुःखात उभे राहण्याची व जन्मोजन्मी सोबत राहण्याचे सात फेरे घेतलेले असतात.अशा व्यक्तीला ही वाटते की, ही व्यक्ती,माझी पत्नी अजुन काही वर्ष जगायला हवी होती. मला अजून ह्या व्यक्तीसोबत आयुष्य आनंदमय, सुंदर-सुखी जगायचे होते. ह्या व्यक्तीच्या असण्याने व माझ्या आयुष्यात येण्याने मला सर्व सुख,वैभव प्राप्त झाले होते. पण अशी सर्वाना आवडणारी व्यक्ती जीवनाच्या अर्ध्यातच जेव्हा साथ सोडून चालली जाते. तेव्हा दुसरा एकाकी जीवन जगणारा साथी म्हणजे पती हेच म्हणतो की, बहोत याद आते है वो लोग जो बीच राह में अकेला छोड़ जाते है! पण ते म्हणतात ना,आजपर्यंत देवापुढे कोणाची चालली आहे.मग हा माणुस नातेवाईकांच्या भाऊगर्दीत स्वताचे मन मारून नियतीचे सत्य स्वीकारून दैनंदिन जीवन जगताना “सौ बरस की जिंदगी से अच्छे है,प्यार के दो-चार दिन” असे म्हणत पुढील दिवसाची वाटचाल करत असतो. सदर वरील प्रसंग हा काही एखाद्या बाॅलीहूड पिक्चरची स्टोरी नसुन साक्षात दोंडाईचा शहराचे माजी नगराध्यक्ष श्री रमेशदादा कुकरेजा यांच्या आयुष्यात मागील वर्षी पत्नी विरहचा घडलेला प्रसंग आहे.आज ३ सप्टेंबर २०२१ रोजी कुकरेजा परिवाराच्या सर्वेसर्वा कै. निर्मला रमेश कुकरेजा कांकीचे एक वर्ष, पुण्यस्मरण दिवसनिमित्त त्यांच्या आठवणींवर माजी नगराध्यक्ष श्री रमेशदादा कुकरेजा यांनी जनमत-टुडेच्या माध्यमातून टाकलेला प्रकाशझोत….
श्री रमेशदादा कुकरेजा तसे म्हटले तर व्यवसायातील निपुण व्यक्तीमत्व.पण एकदम भावनाशील-मनाने हळवा माणुस. ते सहजासहजी कोणाचा जवळ जात ही नाही आणि नवीन कोणाशी जवळीक ही वाढवत नाही. मात्र ज्यांच्याशी जवळीकता मैत्री झाली. तर त्याच्या सुख-दुःखात तो बोलवं न बोलवो, मात्र हा माणुस हजेरी लावून वेळप्रसंगी मदतीसाठी उभा राहत असतो.म्हणून आजही गावात अनेक उंचीच्या लोकांमध्ये ह्या माणसांच्या वागण्या-बोलण्याची,व्यवहाराची क्रेझ,आवड कायम आहे. आज रमेशदादांकडे सर्व काही भोलेनाथच्या कृपेने व्यवस्थित आहे. मात्र मागील करोनाकळात कै.निर्मला काकींच्या जाण्याने जो आघात परिवार व स्वतः वर झाला. त्याची भरपाई आजच्या तारखेत काहीही केल्याने भरून निघणार नाही.म्हणून आज पुण्यस्मरण दिनी रमेशदादांनी त्याच्या आठवणींना उजाळा देताना सागिंतले की, सिन्धी काॅलनीत आमचा कुकरेजा परिवार मोठा,त्यात कुटूंबात आम्ही चार भाऊ,दोन बहिणी,आई-वडील,आजोबा असे एकत्र राहत होतो.वडीलांचा सिन्धी काॅलनीतच कापड दुकानाचा व्यवसाय होता.त्यावेळी घरात मीच मोठा असल्याने आजोबा-वडीलांची दाट इच्छा होती की,माझे लग्न करून टाकावे. जेणेकरून परिवारात एक व्यक्ती वाढून परिवार वाढीस नेऊन दैनंदिन कामात घरातील मंडळींचे हातही वाटले जातील. मी ही लग्न विधी बाबत अनभिज्ञ असल्याने लागलीच होकार भरला.शेवटी आपले ज्येष्ठ आपला चांगलेच विचार करतील ह्या भावनेतून लग्नासाठी तयार झालो. दिनांक ०७|०२|१९७३ रोजी वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न झाले.घरात दोन बहिणी व तीन भाऊ तर सर्वात लहान राजेश हा चार वर्षाचाच होता. त्यावेळी निर्मला माझ्या जीवनात आल्याने तिने नुसते माझे,वडील-आजोबांचेच नाही. तर माझे पाचही भाऊ-बहिणींचे संगोपन पासुन शिक्षण, लग्नकार्य करे पर्यंत अपार मेहनत घेतली.कारण लग्नानंतर चार वर्षातच आईचे निधन झाले होते. त्यामुळे भाऊ-बहिणींची येणारे काळातील सर्व चांगले करायची जबाबदारी आमची होती. मी ही सुरूवातीला जुन्या रेल्वे लाईनच्या बाजुला कापड व्यवसायाने सुरूवात केली. मात्र निर्मलाच्या पायगुणाने नंतर त्याठिकाणीच लहानशा टपरीत खिल्ले-कडीकोंडा व बांधकामासाठी लागणारा मध्यप्रदेशातील बळवा गावातील चुना विक्रीच्या व्यवसायाने सुरूवात केली.मग हळूहळू हार्डवेअर,प्लाउड,फोरमायका,मोतील इंडस्ट्रीज व आज बांधकाम व्यवसायात प्रगती करत आहे.
आई-वडिलांची पुण्याई व भोलेनाथची कुपा किंवा निर्मलाचे पायगुण समजा व्यवसायात दिवसेंदिवस आमच्या चारही भांवाच्या मेहनतीला यश-वैभव मिळत गेले, प्राप्त झाले आहे. आजपर्यंत डोक्यावर कोणाचाही एक रुपया न ठेवता. कोणाशीही निस्वार्थ बुद्धीने संबंध प्रस्थापित करत.सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणाचेही वाईट विचार करत नसल्याने,आज सामाजीक, राजकीय क्षेत्रातही चांगली गतविधी आहे.मात्र २००८ मध्ये निर्मलाला जसा आजार झाल्याचे लक्षात आले.तसे मी नासीक,मुंबई येथे दाखवत. चेन्नई येथे उपचार घेतला व तिने प्रतिसादही चांगला मिळाला. मात्र करोनाकळात पुन्हा आजाराने डोकेवर काढल्याने, मी हिमंतीने अनेकवेळा करोनाकळात मुंबई गाठली. पण ते म्हणतात ना,नसीबापुढे कोणाची चालते.देवाची हिच इच्छा असेल. तिचा साथ माझ्यासोबत इथपर्यंतच असेल.आज सत्तेचाळीस वर्ष लग्नापासून मागील वर्षीपर्यंत आम्ही सोबत, गोडी-गुलाबीने संसार करत होतो. तिचा संसारातला प्रत्येक गोष्टीत घेतलेला सामजंसपणा माझ्या परिवाराच्या प्रगतीचे खरे कारण आहे.
स्वतःच्या इच्छे प्रमाणे जगण्यापेक्षा आम्ही एक दुसर्याच्या इच्छानुसार आजपर्यंत जगत होतो. तीची धार्मिक वुत्ती, देवावर असलेला विश्वास व घरी आलेल्या गरजवान व्यक्तीला केलेली मदत कधीच कोणाला माहित पडू दिली नाही.एक स्रीचे पूर्ण आयुष्य म्हणजे मुलगी, सुन, पत्नी, आई,सासु, आजी असे सर्व सुख तिने जीवनात पाहिले. मी तर हेच म्हणतो की,काया सुदंर न माया सुदंर पण ज्याचे मन सुदंर असते त्याला जग सुद्धा सुदंर दिसते. मला आजही ती माझ्या सुख-दुःखात असण्याचा भास नेहमी होत असतो.माझ्यावर कितीही संकटाचा प्रसंग आला.तरी ती नेहमीप्रमाणेच माझ्यासोबत उभी दिसते. आजही तिच्या आठवणींने मन दाटून येते. म्हणून शेवटी फक्त चार ओळी….
ऐसे कैसे मान लूं…
“बेहद प्यार है तुमसे” से लेकर
“अपनी हद में रहो” तक का प्रेम
रूह से निभाया है मैंने उसके साथ
ऐसे कैसे मान लूं कि वो
इतनी जल्दी छोड़ भी जाएगी मुझे।।
“सांसों के उस पार भी साथ निभाऊंगा”
से लेकर “फालतू टाइम नहीं है” तक का
इंतजार निभाया है मैंने उसके साथ
ऐसे कैसे मान लूं कि वो
इतनी आसानी से छोड़ जाएगी मुझे।।
“तुम बस बोलते रहा करो” से लेकर
“अब कुछ मत कहो” तक का
साथ निभाया है मैंने उसके साथ
ऐसे कैसे मान लूं कि वो
इतनी जल्दी भूलकर छोड़ भी जाएगी मुझे।।
“तुम बहुत अच्छा काम करते हो” से लेकर
“तुम बस काम करते ही रहते हो” तक का
इकरार निभाया है मैंने उसके साथ
ऐसे कैसे मांन लूं कि वो
इतनी जल्दी सारे सपने तोड़कर,छोड़ जाएगी मुझे।।….






