कामगारांच्या पगाराचे पैसे नेणाऱ्या ड्रायव्हरची पुण्यात लूट

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : मौज मजा करण्यासाठी दरोडा टाकणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

कामगारांच्या पगाराचे पैसे घेऊन जात असताना वाल्हेकर वाडी भागातील साई स्टील कंपनीच्या चालकाला काही दिवसांपूर्वी मारहाण करुन लुटण्यात आले होते.दरोडा प्रकरणाचा तपास करताना दरोडा विरोधी पथकाला ड्रायव्हर अभिषेक शिरसाठ याच्यावर संशय आला.

त्यानंतर चौकशी केली असता त्यानेच आपल्या मित्रांना पैसे घेऊन जात असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे कासीम खुर्शीद, यश गणेश आगवणे आणि सागर आदिनाथ पवार यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here