मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या अजिंक्य गायकवाडचा मृत्यू

अहमदनगर (प्रतिनिधी) : येथे विजेचा धक्का लागून ‘मिस्टर एशिया किताब’ पटकवणाऱ्या अजिंक्य गायकवाडचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक घटना घरामध्येच घडल्याचं समजतंय. घरातील टीव्ही व्यवस्थित चालत नसल्यानं अजिंक्य टीव्ही केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्यानं अजिंक्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे अजिंक्य गायकवाडचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अजिंकच्या अकाली मृत्यूनं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. महावितरण आणि केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला असल्याचं त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे. दरम्यान, २०१९ साली अजिंक्य गायकवाडनं ‘मिस्टर वर्ल्ड’ या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याच्या अकाली जाण्यानं मित्र परिवार, त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे झाल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here