अमरावती नदीवरील मोठ्या पुलावर जीवघेणे खड्डे

गावात गणपती स्थापनेच्या परिस्थितीवर नगरपालीकेने डागडुगी करणे गरजेचे…

दोंडाईचा (प्रतिनिधी) : येथील रहदारीसाठी महत्वाचा असलेला अमरावती नदीवरील मोठा पुल जीवघेणा ठरत आहे. ह्या पुलावर दैनंदिन छोटा-मोठा अपघात होत. लोकांना रोज मुत्यूचा सामना करावा लागत आहे. म्हणून नगरपालीका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्यावर कामाला लागेल का?असा प्रश्न गावात गणपती स्थापनेच्या परिस्थितीवर जनतेतुन उमटत आहे. म्हणून लवकरात लवकर डागडुगीकरण नगरपालीका व बांधकाम विभागा कडून करण्यात यावे,अशी मागणी दोंडाईचेकर नागरिक करत आहे.

अमरावती नदीवरील मोठा पुल हा रहदारीसाठी खुप महत्वाचा मानला जातो. ह्या पुलावरून दैनंदिन पायी पी.बी.बागल महाविद्यालय, नुतन माध्यमिक, वसुधा पब्लिक स्कुल, नुतन सायन्स काँलेज,नर्सिंग महाविद्यालय, बी.एड.महाविद्यालयात जाणारे हजारो विद्यार्थी, तसेच विविध रहिवासी काँलन्यामधुन ये-जा करणारे नागरिक, विशेषता धुळे-साक्रि मार्ग शहादा-नंदुरबार, सुरत गुजरातकडे खाजगी व एस.टी.महामंडळाच्या अनेक गाड्यांचा वापर दैनंदिन ह्या पुलावरून होत असतो.मात्र ऐन पाऊसाळ्यात ह्या पुलाची अवस्था बद पेक्षा बत्तंर झाली आहे. म्हणजे ह्या रोडावर खड्डे जात व सुधारित, चांगला रस्ता कमी आहे. जागोजागी खड्डे दिसतात.म्हणून जो तो पायीपासुन वाहन चालवणारा व्यक्ती खड्डे वाचविण्यासाठी एक-दुसऱ्याचा अंगावर जायचा घटना घडतात. अनेकवेळेला छोट्या-मोठ्या वादविवाद-अपघाताच्या घटना नित्यांचीच पहायला मिळतात. अनेकदा वाहने अंगावर चालून येत असल्याने सामान्य विद्यार्थींच्या जीवास धोका देखील निर्माण झाला आहे. ह्या पुलावर मागे गावातील उत्तर महाराष्ट्र विद्धापीठात नावाजलेले व्यक्तीमत्व प्राध्यापक पती -पत्नी महाविद्यालयातून घरी परतत असताना बारा चक्के ट्रकच्या खाली आल्याने अक्षरशः डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.

bridge-of-dondaicha

आजही ही घटना अंगावर शहारे आणते.तसेच माजी नगरसेवक हे ही मित्रासोबत आँटो रिक्षाने ह्या पुलावरून पार्टीसाठी जात असताना खड्डे टाळण्याच्या नादात रिक्षा चाळीस फुट पुलाखाली पडली होती. यासारखी दैनंदिन अनेक लहान-मोठ्या घटना दाखल्यासाठी देता येतील. पण नगरपालीका व सार्वजनिक बांधकाम विभाग एखाद्याचा जीव ह्या मोठा पुलावरून जाईल. तेव्हाच जागे होतील का? असा प्रश्न दोंडाईचाकर सुज्ञ नागरिकांना पडला आहे. सध्या गावात सर्वत्र गणेश स्थापनेची सुरुवात केली जात आहे. त्यामुळे जास्तकरून ह्या मोठ्या पुलावरून बरेच गणेश मंडळ विसर्जनाला आपला गणेश मुर्ती घेऊन जात असतात. तसेच शाळा-महाविद्यालय सुरु होत असल्याने ह्या पुलावर रहदारी वाढणार आहे. म्हणून दोंडाईचा-वरवाडे नगरपालीका व सार्वजनिक बांधकाम विभागाने ताबडतोब ह्या पुलांच्या खड्ड्यांकडे जातीने लक्ष देवून डागडुगी करावी,जेणेकरून कोणी आपल्या-गरिबाचा, निष्पाप जीवाचा अपघातात बळी जाता कामा नये अशी अपेक्षा सुज्ञ दोंडाईचेकर बाळगून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here