शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शहरातील लक्ष्मी नगर भागात वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्यांकडून थकीत बिलामुळे घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरू होते. ही माहिती कळताच काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले तसेच शहर उपाध्यक्ष सुरेश आरणे यांनी प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती जाणून घेतली.
शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी महसूल मंत्री नामदार थोरात यांचे स्वीय सहाय्यक श्री हिंगे व कार्यकारी अभियंता श्री.थोरात यांच्याशी संपर्क करून कारवाई स्थगित करण्यास सांगितले व टप्प्याटप्प्याने नागरिकांकडून वसुली करावी.अशी विनंती केली. या वेळी कारवाईत सहभागी असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विज जोड तोडण्याचे काम तात्काळ थांबविले.






