दोंडाईचा (प्रतिनिधी) : दोंडाईचा येथील संत शिरोमणी गुरू रविदास महाराज चर्मकार संघटना तर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर ह्या दिवशी “शिक्षक दिन” मोठ्या हर्ष-उल्हासात साजरा करण्यात आला व यावेळी चर्मकार समाजातील येणाऱ्या नवीन पिढीने शिक्षणाचे आयुष्यात असलेले महत्त्व समजुन आपली व आजुबाजुची परिस्थिती कशी बदलता येते.म्हणून पंधरा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी विद्येची देवता सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज, संत शिरोमणी गुरू रविदास महाराज, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष रिटायर माजी मुख्याध्यापक डी. के. सूर्यवंशी यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक एस एम पाटोळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपालिका शाळा मुख्याध्यापक डी. के. सूर्यवंशी व दादासाहेब रावल हायस्कूल माजी मुख्याध्यापक एस. एम. पाटोळे यांनी आपल्या मनोगतात, जीवनात शिक्षकांचे महत्त्व विशद केले व सामाजिक बांधलकी जपत संत रविदास मंडळाने हा कार्यक्रम घेतला म्हणून प्रशंसा केली व समाजपयोगी कार्यास शुभेच्छा देऊन आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन मोरे यांनी केले व सरस्वती बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन सुसक्षित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी समाजातील पंधरा शिक्षकांचे शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यात माजी मुख्याध्यापक डी. के. सूर्यवंशी, माजी मुख्याध्यापक एस. एम. पाटोळे,मुख्याध्यापक आर. डी. वसईकर, पर्यवेक्षक राजेंद्र बी.सूर्यवंशी, प्रा. सदानंद वानखेडे, प्रा. डॉ. निंबा वाल्हे व शिक्षक युवराज खैरनार, मनोहर पवार, राजन मोरे, शिक्षिका सरस्वती बोरसे, शर्मिला वानखेडे , अनिता सुर्यवंशी, गायत्री मोरे, आदी मान्यवर शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास विमलबाई बोरसे, सिमाबाई अहिरे, उज्वलाबाई अहिरे, वंदना मोरे, उज्वला अहिरे, विशाल जाधव, प्रशांत मोरे, घनश्याम अहिरे, दोंडाईचा चर्मकार संघटना अध्यक्ष देवेंद्र अहिरे, उपाध्यक्ष अजय विसावे, सचिव गणेश विसावे, भिका अहिरे, अविनाश बागले, हर्षदा बोरसे, यशोदिप बोरसे, सौरभ परदेशी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजन मोरे आभार प्रदर्शन संजय बोरसे यांनी केले.



