खडकी येथे तरूणाच्या डोक्यात वार करून खून

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथे एका तरूणाच्या डोक्यात अज्ञाताने शस्त्राने वार करून खून केल्याची घटना खडकी रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. रमजान सय्यद (वय ३५) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हवालदार अनिल रामदास शेलार यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान सय्यद २ सप्टेंबरला खडकी रेल्वे स्टेशन परिसरात थांबला होता. त्यावेळी अज्ञाताने त्याच्यावर शस्त्राने डोक्यात वार करून जखमी केले.

उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून आरोपींचा माग काढला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here