चालकाच्या चुकीमुळे झालेल्या कार अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) : हरिद्वार येथे मुलाचे मुंडन करून घरी परतताना कार अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. मेरठ-दिल्ली एक्सप्रेस-वेवर सोमवारी रात्री हा अपघात झाला. यात दांम्पत्यासह पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये अकरा वर्षांची मुलगी आणि एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मसूरी पोलिस ठाण्याचे अधिकारी शैलेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या मुंडनासाठी आलमबाग येथील आशिष सिंन्हा आपल्या कुटुंबासह हरिद्वार येथे गेले होते. मुंडनाचा कार्यक्रम आटोपून ते घरी निघाले. मेरठ एक्सप्रेसवेवर कलछीना गावाजवळ आले असता चुकीच्या दिशेने येणाऱ्या मिनी ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिला.

अपघात एवढा भीषण होता की, यात सिन्हा यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. कारचाही अक्षरश: चुराडा झाला आहे. चुकीच्या दिशेने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडला. मिनीट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here