रायगड (प्रतिनिधी जयेश जाधव) : कर्जत पोलिस ठाण्यात प्रभारी पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की रूजू झाल्यापासून कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या , फसवणूक, चोऱ्या, हाणामारी या दररोज घडणाऱ्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे तसेच या गुन्ह्यांच्या तपास मंद गतीने होत आहे
याशिवाय कर्जत शहरात बहुतांश ठिकाणी बेकायदेशीर मटका जुगार, अवैध दारुचे अड्डे राजरोसपणे सुरू असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे त्यामुळे कर्जत पोलिस ठाण्यात नव्याने पोलीस निरीक्षक रूजू झाल्यापासून एकही गुन्हयाचा उलगडा होत नसल्यामुळे या अकार्यक्षम पोलिस निरीक्षकांना कर्जत तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 08 सप्टेंबर 2021 रोजी 2-30 वा. सुमारास मौजे महालक्ष्मी हॉटेल समोर च्या मोकळया जागेत कोणीतरी अज्ञात चोरटयाने कर्जत तालुक्यातील वावे येथे राहणारे फिर्यादी यांची एकूण 15 हजार रुपये किमतीची एक काळया व लाल रंगाची सुपर स्प्लेंडर हीरो कंपनीची तिचा क्रमांक एम एच-46/ए एम 5309 ही मोटार सायकल फिर्यादीची संमतीशिवाय लबाडीचे हेतुने स्वत:चे फायदयाकरीता चोरुन नेली आहे.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 240/2021, भा.द.वि.कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार काठे हे करीत आहेत.






