मुंबईनंतर मंगळुरू विमानतळावरून हटवला अदानींच्या नावाचा फलक

मंगळुरू : येथील विमानतळावर लावण्यात आलेले अदानी एअरपोर्ट हा नामफलक स्थानिकांच्या विरोधानंतर विमानतळावरून हटवण्यात आला आहे. अदानी समुहाने या विमानतळाचे व्यवस्थापन पाहण्यापुर्वी असाणारा नामफलक आहे तसा पुन्हा लावण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलराज आल्वा यांनी दिली.

या विमानतळाचे व्यवस्थापन स्वीकारल्यापासून अदानी समुहाने या विमानतळाचे नाव अदानी विमानतळ असे बदलले होते. मात्र, विमानतळाचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी झालेल्या करारात नाम बदल करण्याचा कोणत्याही कलमाचा समावेश नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले होते. त्यानंतर अदानी समुहाच्या या कृतीवर आक्षेप घेण्यात येत होता.

विमानतळ प्राधिकरण आणि अदानी समुहाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. मात्र ही कायदेशीर लढाई सुरू होण्यापुर्वीच हा तिढा सुटला आहे. जुन्या नावानेच पुन्हा फेसबुक आणि ट्‌विटर अकौंट सुरू करण्यात आले आहे, असे अल्वा म्हणाले.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामांतर करण्याचा अदानी समुहाचा डाव शिवसेनेने उधळून लावला होता. शिवसेनेने विमानतळावर उभारण्यात आलेले फलक उद्‌ध्वस्त केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here