दिल्ली पोलिसांनी केली शस्त्रास्त्रं, स्फोटकांसह ६ जणांना अटक

नवी दिल्ली : येथे सुरक्षा यंत्रणांनी २ पाकिस्तानी नागरिकांसह ६ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले पाकिस्तानी दहशतवादी कारवाया करत होते. या सगळ्यांची चौकशी सध्या सुरू आहे.

एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यातले २ पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यांना पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिलं आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दिली.

या प्रकरणी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये छापे टाकण्यात आले. यामधून सहा जण सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानमधून मिळणाऱ्या आदेशांवर त्यांचं काम सुरू होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here