पुण्यात हफ्तावसुली करणाऱ्या अल्पवयीन मुलांनी केला दुकानदारावर कोयत्याने हल्ला

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहरातील कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसल्याचे चित्र दिसत आहे. अल्पवयीन पोरं सुद्धा दुकानदारांकडून हफ्ते वसुली करत असल्याचे समोर आले आहे. एका दुकानदाराने हफ्ता दिला नाही म्हणून मालकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना समोर आली आहे.

पिंपरी चिंचवडच्या डीलक्स चौकातील मिस्टर मॅड या दुकानात हप्ता मागण्यांसाठी आलेल्या अल्पवयीन मुलांनी रेडिमेड कपड्याच्या दुकान मालकावर कोयत्याने सपासप वार करून दुकानात मोठी तोडफोड केली आहे.

या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. दुकानात तोडफोड करणारी मुलं हे पिंपरी भागातीलच स्थानिक रहिवासी असून त्यांनीही दुकान मालकाकडे हप्ता मागण्यासाठी कोयत्याने वार केले आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता दुकान मालक इब्राहीम सलीम शेखच्या तक्रारीवरुन पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये तीन अल्पवयीन आरोपी मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here