सेवानिवृत्त जवान दादाभाई नगराळे यांची मिरवणूक व भाजपातर्फे नागरी सन्मान

पाईप फँक्टरीत पहारेकरीची नोकरी करून शिक्षण व सैन्य दलात भरती झालो व देशसेवा केली-निवुत्त जवान दादाभाई नगराळे

दोंडाईचा (प्रतिनिधी) : शहरातील जवान दादाभाई उत्तम नगराळे हे भारत तिब्बत सिमा सुरक्षा दलाच्या बावीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतुन निवृत्त झाले.त्यानिमित्त काल दि.१४ संप्टेबर मंगळवार रोजी त्यांचे रेल्वे स्थानकावर आगमन होताच, त्यांचे दोंडाईचा शहरात डिजेच्या तालावर थिरकत तरुणांनी भव्य मोटार सायकलवर मिरवणुक काढली. मिरवणुकीचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादन करुन करण्यात आला होता.

या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नबु बशीर पिंजारी होते. तर भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन यांच्या हस्ते दादाभाई नगराळे यांना शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमास नगरसेवक संजय तावडे , जितेंद्र गिरासे, ईश्वर धनगर, संदीप धनगर, माजी नगरसेवक रामभाऊ माणीक,इस्माईल पिंजारी,रघुनाथ बैसाणे, कांतीलाल मोहिते, संजय नगराळे, कालू नगराळे, रवी महाले, सचिन नगराळे, रवी अहिरे, गोविंदा नगराळे, प्रवीण आगळे, सिद्धार्थ रामराजे, धनराज करणकाळ, अजय बिऱ्हाडे, सागर नगराळे, मुकेश नगराळे, राकेश वाघ, प्रफुल नगराळे, सागर नगराळे, भूषण नगराळे,भुपेन्द्र मोहिते,सुनील पवार, शिवा नगराळे, संग्राम मोहिते, भैय्या नगराळे, राजू नगराळे,पप्पू सुतारे, सेवानिवृत्त जवान दादाभाई नगराळे, संतोष रामराजे यांचेसह सेवेत कार्यरत सहकारी राहुल पाटील ,निलेश धनगर ,कुणाल पाटील तसेच आंनद माणिक, प्रवीण नगराळे, शंतनू पगारे,आकाश इंदवे,राहुल रामराजे, रोहित नगराळे, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन आरोग्य सभापती कृष्णा नगराळे व डॉ बाबासाहेब चौक मित्र मंडळाने केले.

यावेळी प्रविण महाजन यांनी सांगितले की, देशसेवेसाठी जवान आपली प्राणपणाची बाजी लावुन देशाच्या सिमा सुरक्षीत ठेवतात. म्हणुन आपण सुरक्षित जिवन जगत असतो. दादाभाई नगराळे यांनी खडतर प्रदीर्घ सेवेत जम्मू , लडाख व सिक्कीम या सिमेवर आपली सेवा बजावली . भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मंत्र शिका ,संघठीत व्हा व संघर्ष करा यांचे पालन केल्यामुळे आज जिवनात यशस्वी झाल्याचे सांगितले. तसेच कृष्णा नगराळे, ईस्माईल पिंजारी, संजय नगराळे, रामभाऊ माणीक, रघुनाथ बैसाणे, संतोष रामराजे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन सेवानिवृत्त जवान दादाभाई नगराळे यांचे कौतुक केले.

तसेच जवान दादाभाई नगराळे यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले की, माझे बालपण अत्यंत गरीब परिस्थितीमुळे हलाखीचे गेले. वडील मोलमजुरी करुन आमच्या मोठ्या परिवाराचा चरीतार्थ चालवीत, त्यामुळे रात्री पाइप फँक्टरीत पहारेकरी बनुन शिक्षण घेतले व शारीरिक परिस्थिती तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करुन परिवाराच्या उद्धारासाठी भारतीय सैन्य दलात भरती होऊन प्रशिक्षण पूर्ण केले व त्यांनतर बावीस वर्ष प्रदीर्घ खडतर सेवा दिली.लहानपणापासून सैन्य दलाचे जवान होण्याचे स्वप्न बघितले होते. ते देशसेवा बजावुन साकार केले असे शेवटी सत्काराला उत्तर देताना दादाभाई नगराळे यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि अहिरे व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक कृष्णा नगराळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here