अष्टविनायक गणेश मित्र मंडळाच्या गणपतीबाप्पाची रामानंद पोलीस स्टेशनचे पीआय शिंदे यांच्या हस्ते आरती

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश पाटील) : शहरातील पिंप्राळा शिवार परिसरातील शिंदे नगरात ‘अष्टविनायक गणेश मित्र मंडळ’च्या श्रीगणेशोत्सवांतर्गत सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी जळगाव रामानंद पोलिस स्टेशनचे पीआय शिंदे यांच्या शुभ हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली.

यावेळी अष्टविनायक गणेश मित्र मंडळाचे भावेश ठाकूर, ज्ञानेश्वर पाटील, सौ.नुतनताई पाटील, गणेश सोनवणे, निखिल ठाकूर, दिलीप पाटील , पवार नाना, संभाजी पाटील, मनोज पाटील , राजू वाघ यांच्यासह कार्यकर्ते, परिसरातील नागरिक व भक्तगण उपस्थित होते.

astavinayak-ganesh-mandal-jalgaon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here