१९ वर्षीय तरुणाने केला ६० वर्षीय महिलेचा खून; नंतर प्रेतावर बलात्कार

rape-on-old-woman

हनुमानगड (राजस्थान) : धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही बुधवारी (१५ सप्टेंबर) रात्री घडली. एक १९ वर्षीय तरुण दारुच्या नशेत एका महिलेच्या घरात शिरला. त्यावेळी घरात एक ६० वर्षीय महिला एकटी होती. महिला घरात एकटीच असल्याची माहिती समजल्यानंतर आरोपी तरुणाने या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. पण महिलेने त्याला स्पष्टपणे नकार दिल्याचा राग आल्याने, त्याने या महिलेचा खून केला.

त्याचा राग एवढा अनावर होता की खून केल्यानंतर त्याने त्या महिलेच्या प्रेतावर बलात्कार केला. संबंधित घटेनची माहिती पोलिसांना कळताच पोलीस महिलेच्या घरी दाखल होतात. ते तपासाची चक्रे फिरवत आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीवर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी इतक्या घृणास्पद पद्धतीने कसं वागू शकतो? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. तर काही स्थानिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here