चंदीगड (पंजाब) : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आज (दि.१८) राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे शनिवारी सायंकाळी ४.३० वाजल्याच्या सुमारास राजीनामा सोपवला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘पक्षात अपमानजनक वागणूक देण्यात आल्याची खंत’ कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केली आहे.
‘राजीनाम्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाचा होता. त्याप्रमाणे मी राजीनामा सोपवला. मी अद्यापही काँग्रेस पक्षात आहे. साडे नऊ वर्ष मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाताळली. समर्थकांशी चर्चा केल्यानंतरच पुढचा निर्णय घेईल. माझ्यासमोर अनेक मार्ग खुले आहेत’, असंही अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.
I feel humiliated by the way talks transpired. I spoke with the Congress president this morning, told them that I will be resigning today… This is the third time in recent months in meeting MLAs… which is why I decided to quit..:Amarinder Singh after resigning as Punjab CM pic.twitter.com/rFojYU51or
— ANI (@ANI) September 18, 2021
आज सकाळीच माझा निर्णय झाला होता. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून संवाद साधून माझा हा निर्णय त्यांना कळवला होता. मला अपमानजनक वागणूक देण्यात आली. माझ्या नेतृत्वावर शंका उपस्थित करण्यात आली. दोन महिन्यांत तीन वेळा संवाद न साधता नेतृत्वाकडून थेट विधिमंडळ दलाची बैठक बोलावण्यात आली. आता मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांच्यावर सोपवावी’, असं वक्तव्य मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना केले.






