मेदनकरवाडीत चोरट्यांनी फोडले मोबाईल दुकान

THIEF

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : मेदनकरवाडी येथे अष्टविनायक इंटरप्रायजेस नावाचे मोबाईल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. ही घटना सोमवारी (दि. २०) रात्री साडेनऊ ते मंगळवारी (दि. २१) सकाळी सव्वासहा वाजताच्या कालावधीत घडली.अतुल राजेंद्र भदाणे (वय ३३, रा. वाकी खुर्द, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेदनकरवाडी येथे सिद्धीविनायक नगर येथे अष्टविनायक इंटरप्रायजेस नावाचे मोबाईल दुकान आहे. फिर्यादी यांनी त्यांचे दुकान सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला.

दुकानातून बॅटरी, टच पॅड, मोबाईल डिस्प्ले, ब्ल्यू टूथ, पॉवरबँक, मेमरी कार्ड, पेन ड्राइव्ह असा एकूण ४८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here