कात्रज परिसरात घरफोडी; दागिने, रोकड लंपास

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : कात्रज भागात सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि दागिने असा एक लाख १३ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिलेच्या बंद सदनिकेचे कुलुप चोरट्यांनी तोडले. कपाट उचकटून ७० हजारांची रोकड आणि दागिने असा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक गौरव देव तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here