…अन् वेगाने आलेल्या मंत्र्याच्या कारने शेतकऱ्यांना चिरडलं; नवा व्हिडीओ व्हायरल

लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) : लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे काही शेतकरी नेत्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली होती.

अजय मिश्रा मात्र आपला मुलगा यामध्ये सहभागी नव्हता असं सांगत आहेत. कार आपल्याच मालकीची आहे याची कबुली देताना मिश्रा यांनी गाडीवर दगड, विटांचा हल्ला झाल्याने ताबा गेला आणि ही दुर्घटना झाली असा दावा केला आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर येत असून वेगवेगळे दावे केले जात आहे. याच दरम्यान आता अंगावर काटा आणणारा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

lakhimpur

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये एक थार गाडी वेगाने येऊन शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी हातात काळे झेंडे घेऊन एकत्र पुढे जात असलेले पाहायला मिळत आहेत. याचवेळी अचानक पाठीमागून एक गाडी वेगाने पुढे येथे आणि शेतकऱ्यांना चिरडून पुढे जाते. त्यानंतर त्यापाठोपाठ दोन आणखी गाड्या वेगाने निघून जातात. या घटनेने नंतर एकच गोंधळ उडतो. शेतकरी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here