सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : मागील दीडवर्षांपासून कोरानाने थैमान घातला आहे. यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्यात आले. परंतु कोरोनाचा संसर्ग कमी होताच पुन्हा मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. दीड वर्षानंतर विठोबाचे सावळे रूप भाविकांना पाहता आल्याने भाविकांचे आनंदाश्रू अनावर झाले.
विठोबाच्या दर्शनासाठी आलेल्या पहिल्या दहा भाविकांचे पुष्पवृष्टी करून मंदिर समितीच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवारड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे यासाठी भाजपच्या वतीने वारंवार आंदोलन करण्यात आले होते. यामुळे श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर खुले होताच भाजपच्या जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी वारकऱ्यांसह मंदिराच्या नामदेव पायरीजवळ आनंदोत्सव साजरा केला आहे. यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फुल देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर भाविकांना प्रसाद देखील वाट आला. यावेळी भाजपाचे लक्ष्मण धनवडे, चांगदेव कांबळे, प्रणव परिचारक, सोमनाथ आवताडे, विक्रम शिरसठ, शशिकांत चव्हाण, सुरेश आंबुरे, धीरज म्हमाने, ॲड. धनश्री खटके, माया माने, अर्पणा तारके उपस्थित होत्या.
Home पश्चिम महाराष्ट्र सोलापूर पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर भक्तांसाठी खुले, मंदिरात भाविकांचा सत्कार






