काठेगल्लीत भरदिवसा चोरी; ४० हजाराचे अलंकार केले लंपास

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : काठेगल्लीत भरदिवसा झालेल्या चोरीत चोरट्यांनी सुमारे ४० हजाराचे अलंकार चोरून नेले. घर उघडे असल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे.

याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपमाला आशिष चव्हाण (रा.धुमकेतू अपा.कॅमल हाऊस शेजारी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चव्हाण कुटूंबिय सोमवारी (दि.४) सकाळच्या सुमारास आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही चोरी झाली.

घराचे दार उघडे असल्याची संधी साधत घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सुमारे ४० हजार ४०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here