पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : कात्रजमधील आंबेगाव आणि कोंढवा परिसरात चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅटचे कुलुप तोडून ५ लाखांचे दागिने चोरून नेले आहेत.
कात्रज परिसरातील आंबेगाव खुर्दमधील राधाकृष्ण सोसायटीतील रहिवासी शिवाजी बनसोडे (वय ५३) यांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील २ लाख ३० हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा ३ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविला.
कोंढव्यातील सादीक मंजिल इमारतीतील फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने, रोकड असा १ लाख ६२ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सादिक शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे तपास करत आहेत.






