कारखान्याच्या दोन मालकांनी सलग ३१ वर्षे केला कामगार महिलेवर सामुहिक बलात्कार

गुरुग्राम : सेक्टर -३७ परिसरातील ही घटना आहे. कारखान्यात काम करणाऱ्या एका महिलेवर ३१ वर्षे सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप कारखान्याच्या दोन मालकांवर करण्यात आला आहे. आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराला अनेकदा विरोध केला होता. पण आरोपी आपल्याला आणि आपल्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प करायचे. अखेर या अत्याचारविरोधात या महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. महिला पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

१९९० मध्ये आपले लग्न झाले. पतीसोबत ती यूपीहून गुरुग्रामला आली. सेक्टर -३७ मधील एका कारखान्यात तिचा पती मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता. मालकांनी त्याला कारखाना परिसरातच राहण्यासाठी खोली दिली होती. या खोलीच्या बाजूलाच कारखान्याचे मालक ओमप्रकाश शर्मा आणि सतीश शर्मा उर्फ पिंकी यांचे कार्यालय होते. पीडित महिलेला त्यांनी आपले कार्यालय स्वच्छ करण्याचे काम दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

५ ऑगस्ट १९९० ला ओमप्रकाश शर्माने पहिल्यांदा आपल्यावर बलात्कार केला. ही घटना सतीश शर्मा उर्फ पिंकीला तिने सांगितली. याबद्दल कोणालाही सांगायचं नाही. त्यानेही महिलेला धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दोघांनी अनेकदा महिलेवर बलात्कार केला. या दरम्यान, एकदा आरोपींनी महिलेचा गर्भपातही केला. या सर्व प्रकरणाबद्दल घरी आता कुटुंबाला सर्व काही सांगणार आहे, असं महिला १७ नोव्हेंबर २०१७ ला ओमप्रकाश शर्मा याला म्हणाली. मी विष प्राशन करून आत्महत्या करेन आणि सुसाइड नोटवर तुझं, तुझ्या पतीचं आणि मुलाचं नाव टाकेल. यामुळे तिघांनाही तुरुंगात जावं लागेल, अशी धमकी त्याने पीडित महिलेला दिला. यामुळे ती महिला घाबरली.

२७ नोव्हेंबर २०१७ ला सतीश शर्माने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने अत्याचाराला खूप विरोध केल्यावर आरोपींनी महिलेच्या पतीला सांगून तिला गावी पाठवले. पण गावावरून परतल्यावर पुन्हा तेच घडू लागलं. यातून सुटका करण्यासाठी पीडित महिला पतीसोबत भाड्याने एका कॉलनीत राहायला गेली. तरीही आरोपी थांबले नाहीत. अखेर पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली. दोन्ही आरोपींविरोधात बुधवारी रात्री महिला पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे असल्याचं महिला पोलिस निरीक्षक पूनम सिंह यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here