बलात्काराचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून उकळले लाखो रुपये

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : महिलेवर बलात्कार करत तीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. ते व्हिडीओ आणि फोटो महिलेच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत तरुणाने महिलेकडून तीन लाख रुपये घेतले. ही घटना ५ मे २०१९ ते जुलै २०२० या कालावधीत म्हाळुंगे गावठाण ता. मुळशी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम अशोक दरंदले (वय २५, रा. सोनाई, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून, याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने गुरुवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपीने फिर्यादी महिलेला त्याच्या भाड्याच्या फ्लॅटवर नेऊन तिथून बाहेर जाण्यास अटकाव करून बळजबरीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. शारीरिक संबंध करतानाच्या वेळी आरोपीने महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. ते फोटो महिलेच्या घरच्यांना दाखवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून तसेच महिलेला अश्लील भाषेत बोलून तिला मेसेज करून तिचा विनयभंग करत महिलेकडून तीन लाख रुपये घेतले. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here