दारुच्या नशेत मुलाची पित्याला बेदम मारहाण, वृद्धाचा मृत्यू

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : दारुच्या नशेत मुलाने आपल्या वृद्ध पित्याला बेदम मारहाण केल्याची येथे उघडकीस आली आहे. मुलाने केलेल्या मारहाणीत वृध्द पित्याचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद शहरातील दलालवादी परिसरातील विकास शेळके (वय ३२) या तरुणाने त्याचे वृद्ध पिता भिकन शेळके (वय ६०) यांना बेदम मारहाण केली आहे.ही मारहाण इतकी बेदम होती की वृद्ध पित्याच्या चेहरा आणि डोक्यातून रक्तस्राव होत होता.

परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भिकन शेळके यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र गंभीर जखमी झालेल्या भिकन यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. या खळबळजनक घटनेमुळे सध्या संताप व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here