इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार यांना अभिवादन

इचलकरंजी (महाराष्ट्र वरिष्ठ कार्यकारी संपादक मनोज सोनवले) : येथील नगरपरिषदेच्या वतीने आज गुरुवार दि.२१ ऑक्टोबर रोजी इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.

शहरातील नाट्यगृह चौकातील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास नगराध्यक्षा अँड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक अमरजीत जाधव, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सचिन शेडबाळे, दिलीप मगदूम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here