आईला मारहाण करणाऱ्या बापाला डोक्यावर लाकडी दांड्याने मारुन केला खून

अहमदनगर (प्रतिनिधी) : पारनेर तालुक्यातील वासुंदे गावात शुक्रवारी रात्री दारू पिऊन आईला मारहाण करुन कोंडुन घेतले म्हणून मुलाकडुन बापाला लाकडी दांडक्याने डोक्यावर व गालावर मारहाण केल्याने मृत्यू झाला असल्याची फिर्याद मयताची पत्नी मंदा बाळासाहेब झावरे (वय ४५ रा. वासुंदे) (मानकापी) यांनी पारनेर पोलिसांत दिली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, टाकळी ढोकेश्वर वासुंदे रस्त्यालगत राहणाऱ्या मानकापी येथे शुक्रवार दि. २२ रोजी रात्री बाळासाहेब बारकु झावरे (वय ५० ) हे कायमच दारू पिवुन येवून मारहाण करत असल्याच्या रागातून मुलगा राहुल बाळासाहेब झावरे याने बापाला लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. बाळासाहेब यांना डोक्याला व गालावर गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यांना टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित करण्यात आले.

याप्रकरणी पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी आरोपी मुलगा राहुल बाळासाहेब झावरे (वय २५) (रा. वासुंदे ता. पारनेर) याला ताब्यात घेतले असून, यासंबंधी फिर्याद मुलाची आई मंदा बाळासाहेब झावरे (वय – ४५ राहणार, वासुंदे) (मानकापी) यांनी पारनेर पोलिसांत दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ सहाय्यक फौजदार शिवाजी कडुस, पो.कॉ गवळी मोढवे, विलास लोणारे, ज्ञानेश्वर साळवे, गायकवाड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here