जालन्यात बुलडाणा अर्बन बँकेवर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत भर दिवसा बँक लुटली

जालना (प्रतिनिधी) – गेल्याच आठवड्यात पुणे जिल्ह्यातील एका बॅंकेवर दरोडा टाकल्याची घटना ताजी असताना राज्यात आज अशीच दुसरी घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बन बॅंकेच्या शाखेवर गुरुवारी पावणेपाचच्या सुमारास फिल्मी स्टाइल दरोडा टाकत तीन दरोडेखोरांनी 25 लाखांची रोख रक्कम व जावळपास 70 लाख रुपयांचे सोने पळवले.

हा प्रकार घडला तेव्हा बॅंकेत दोन क्‍लार्क, दोन कॅशिअर, दोन शिपाई, एक मॅनेजर हजर होते. बंदुकीचा धाक दाखवून तिघे बॅंकेत आले. नंतर बॅंकेतील सर्वांना बंदुकिचा धाक दाखवून एका जागेवर बसवले. त्यानंतर रोख रक्कम 25 लाख रूपये व तीन लॉकरमधील सुमारे 70 लाख रूपयांचे सोने घेउन त्यांनी पोबारा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here