आईला शिवीगाळ केली म्हणून मुलाने केला वडीलांचा खून

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : वडिलांनी आई, मुलगा आणि इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून मुलाने वडिलांना धक्काबुक्की करत कठड्यावर ढकलून देत त्यांचा खून केला. ही घटना गुरुवारी सकाळी मावळ तालुक्यातील चंदनवाडी चांदखेड येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू शंकर पारधे (वय ५३) हे आरोपीचे वडील होते. त्यांनी त्यांची पत्नी मंजुळाबाई, मुलगा गणेश आणि घरातील इतर सदस्यांना शिवीगाळ केली. या कारणावरून राग आल्याने मुलगा गणेश राजू पारधे (वय २८, रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ) याने वडील राजू यांना धक्काबुक्की केली. तसेच घरासमोरील दगडी कठड्यावर ढकलून दिले. राजू पारधे दगडी कठड्यावर जोरात आपटले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

गणेश राजू पारधे (वय २८, रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here