गावठी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

बुलडाणा (प्रतिनिधी) : बेकायदा गावठी पिस्तूल व काडतूस बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली. चिखली मोरेवस्ती रस्त्यावर ओमसाई इमारत येथे शनिवारी (दि. ३०) दुपारी तीनच्या सुमारास चिखली पोलिसांनी ही कारवाई केली.

मोहम्मद मोनिश इसरार अहमद शेख (वय २५, रा. साईनगर, देहूरोड, मूळ रा. नवी दिल्‍ली) आणि फरमान इसुब अनसारी (वय २४, रा. मोरेवस्ती, चिखली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार सुनील शिंदे यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणाच्या तरी जिविताला धोका पोहचविण्यासाठी आरोपींनी शस्त्र बाळगल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चिखली पोलिसांनी कारवाई केली. आरोपींकडे २५ हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्तूल व १०० रुपये किमतीचे एक काडतूस मिळून आले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here