चंद्रपूर (प्रतिनिधी) : येथे एका विकृत तरुणाने भटक्या कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावरील वाहन शोरूम लगतच्या जागेत ही घटना घडली. प्रकाश डाफ असं या विकृत तरुणाचे नाव आहे. या विकृत तरुणाने रस्त्यावर असलेल्या एका कुत्रीवर शोरूमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत नेऊ तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. हा सगळा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला.त्यानंतर स्थानिकांनी या घटनेबद्दल प्यार फाउंडेशन प्राणीमित्र संघटनेला याची माहिती दिली. संघटनेच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तसंच या संघटनेनं पोलिसांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी प्रकाश डाफ याला अटक केली आहे. त्याच्यावर कलम ३७७ नुसार शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.






