६ महिन्यांची गरोदर असलेल्या पत्नीला दिले पेटवून

ठाणे (प्रतिनिधी मुनिर खान) : ठाण्यातील कळवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती भांडणातून पतीने आपल्या सहा महिन्यांच्या गरोदर पत्नीला पेटवून दिले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील कळवा परिसरातील मफतलाल कॉलनीत अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पतीने तिला पेटवून दिले. महिला सहा महिन्यांची गरोदर होती, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये अर्भकाचा गर्भातच मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here