नागपूर (उपसंपादक उमेश अबनलकर) : येथील मानकापूर पोलिसांनी वेगवेगळे कपडे बदलून बाईक चोरी करणाऱ्या एका बाईक चोराला बेड्या ठोकल्या आहेत. या चोराकडून चोरी केलेल्या १७ बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बाईक चोरी करायला जायच्या आधी तो कपडे बदलायचा एक चोरी एक ड्रेस अस त्याचं तत्व होते.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची चोरी होत होती. त्यावरून पोलिसांनी याकडे लक्ष केंद्रीत केलं आणि या चोराच्या मुसक्या आवळल्या. बाईक चोरी करण्यात पटाईत असलेला आरोपी मानकापूर पोलिसांच्या हाती लागला त्याची चौकशी करतातच एक दोन नाही तर चक्क १७ बाईक त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या.
या चोराची चोरीची पद्धत पाहून पोलिसही अवाक झाले. इतर चोरांच्या तुलनेत निराळी असलेल्या या पध्दतीत. तो जेव्हा बाईक चोरी करायला निघायचा तेव्हा कपडे बदलायचा, एक चोरी झाली की ड्रेस बदलून तो दुसऱ्या चोरीसाठी निघायचा. बाईक चोरी केली की तो त्याचा साथीदार असलेल्या गॅरेजवाल्याकडे जातात त्या गाडीचे पार्ट काढून दुसऱ्या गाड्यांना लावून त्याची विक्री करत असत. आतापर्यंत १७ बाईक चोरीच्या घटनांचा उलघडा झाला असला तरी आणखी काही गुन्हे पुढे येण्याची शक्यता आहे.






