आघाडी सरकारची इंधन कपातीत पिछाडी का? भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचा राज्य सरकार सवाल

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यापाठोपाठ देशातील ११ राज्य सरकारने मूल्यवर्धित कर कपात करुन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. मात्र गेंड्याची कातडी असलेले ठाकरे सरकार केवळ राजकारण करत जनतेला इंधन कपातीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील जनतेला केवळ आघाडी असल्याचे सांगत सुटले आहे, मात्र आघाडीत असलेले हे सरकार इंधन कपातीत पिछाडीवर का ? असा सवाल भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केला आहे.

पुढे जिल्हाध्यक्ष गोंदकर म्हणाले की, जागतिक बाजारात कच्या तेलाच्या भाव वधारल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून गेल्या काही दिवसापासून सातत्याने इंधन दरवाढ सूरु आहे. या जागतिक संकटाचा सामना करत देशाचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी यातील सुवर्णमध्य साधत केंद्र सरकारने मूल्यवर्धित कर कपात केले. त्या पाठोपाठ देशातील उत्तरप्रदेश, त्रिपुरा, सिक्कीम, आदीसह ११ राज्यांनी राज्याचे मूल्यवर्धित कर कपातीचा निर्णय घेतला. त्यातून देशवासीयांना मोठा दिलासा देण्याचं काम केले.

मात्र महाराष्ट्रातील आघाडी सरकार केवळ राजकारण म्हणून केंद्र सरकारच्या निर्णयापाठोपाठ निर्णय घेण्यास असमर्थ ठरले आहे. आणि या राजकारणात राज्यातील इंधन दर वाढीचा फटका दिवाळीतही कायम ठेवत अतिशय घाणेरडे राजकारण खेळण्याचा डाव करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता अशा आघाडी सरकारला माफ करणार नाही. महाराष्ट्रात आघाडीचा गवगवा करणारे ठाकरे सरकार इंधन कपातीपासून राज्याला का दूर ठेवत आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यामुळे हे आघाडीचे सरकार इंधन कपातीच्या निर्णयावर पिछाडीवर का आहे असा सवाल राजेंद्र गोंदकर यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here