चेंबूर येथे पत्नी बोलत नसल्याच्या रागातून पतीचा भररस्त्यात चाकूहल्ला

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : पत्नी बोलत नाही म्हणून पतीने तिचा पाठलाग करत तिच्यावर जीवघेणा हल्ला चढविल्याची घटना चेंबूर येथे घडली. यात आकांक्षा (वय २१) हिचा मृत्यू झाला असून आरसीएफ पोलिसांनी पती अक्षय आठवले याला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

२०१९ मध्ये तिचा अक्षयसोबत विवाह झाला होता. त्यानंतर काही कालावधीने त्यांच्यात वाद सुरू झाला होता. याच रागात गेल्या काही महिन्यांपासून तीआपल्या घरी वेगळी राहू लागली. अक्षय तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता; पण ती त्याच्याशी बोलत नव्हती. बुधवारी सकाळी आकांक्षा नेहमीप्रमाणे रिक्षाने कामाला निघाली. दुचाकीवरून आलेल्या अक्षयने राहुलनगर येथे तिची रिक्षा अडवून पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्याने त्याने आपल्याकडील चाकूने तिच्यावर वार केले.

या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. स्थानिकांच्या मदतीने तिला सायन रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वी ती मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.याप्रकरणी आरोपी अक्षय याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे आरसीएफ पोलोस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here