एकतर्फी प्रेमातून दोन मुलांची आई असलेल्या विवाहितेवर ब्लेडने वार

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : तिमारपूर परिसरात एका माथेफिरू तरूणाने विवाहित महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. ही महिला रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडली. काही लोकांनी या महिलेला रुग्णालयात दाखल केले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आरोपीला अटक केली. सुशील असे या माथेफिरू तरुणाचे नाव असून, तो २१ वर्षांचा आहे. पोलिसांनी आरोपीकडून ब्लेड, आरोपीची बाइक आणि महिलेचा मोबाइल जप्त केला आहे. या घटनेचा तपास करत असतानाच पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. आरोपीने यापूर्वी एप्रिलमध्येही महिलेवर हल्ला केला होता. तिमारपूर पोलीस आरोपीकडे कसून चौकशी करत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३० वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वजिराबाद परिसरात राहते. तिला दोन मुलेही आहेत. आरोपी सुशील तिच्या घराजवळच राहते. त्याचे या महिलेवर एकतर्फी प्रेम जडले. महिलेला याबाबत माहीत झाल्यानंतर तिने त्याकडे दुर्लक्ष केले. आरोपी तरूण तिचा पाठलाग करू लागला. एप्रिलमध्येही आरोपीने तिच्यावर हल्ला केला होता.

ही महिला मंगळवारी आपल्या दोन्ही मुलांना क्लासला सोडण्यासाठी जात होती. त्यावेळी तरुणाने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मुलांना क्लासला सोडून परत येताना तरुणाने तिच्यासमोर दुचाकी उभी केली. या महिलेला त्याने आपल्या दुचाकीवर बसायला सांगितले. आरोपीने गोंधळ घालू नये म्हणून ही महिला त्याच्या दुचाकीवर बसली. आरोपी तिमारपूर परिसरात तिला घेऊन गेला. निर्जन ठिकाणी नेऊन तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केले आणि घटनास्थळावरून तो फरार झाला. पोलिसांनी तपास करून बुधवारी या आरोपीला अटक केली.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here