चाळीसगाव (प्रतिनिधी) : पुण्यामध्ये घर घेण्यासाठी माहेरुन दहा लाख रुपये आणण्याची मागणी करीत विवाहितेचा शारीरीक आणि मानसिक छळ करणार्या नवर्यासह सासू, सासरे आणि अन्य तीन जणांच्या विरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
चाळीसगांव येथील सिंधी कॉलनीत राहणारी सोनम भ्र. विनय दुसाने हिचा नासिक येथील विनय प्रकाश दुसाने याचेसोबत विवाह झालेला होता. लग्नानंतर आमचा लग्नात मानपान झाल नाही, यासह माझा पती पुण्यात नोकरीस आहे म्हणून तेथे घर घेण्यासाठी तुझ्या वडीलांकडून दहा लाख रुपये आण अशी मागणी करीत या ना त्या कारणावरुन सदर विवाहितेचा शारीरीक आणि मानसिक छळ हा तिचा पती विनय दुसाने, सासरा प्रकाश नामदेव दुसाने, सासू उषा उर्फ शकुंकला दुसाने, दिर राहुल दुसाने सर्व रा. नाशिक तसेच मावस सासरा रविंद्र गंगाधर विसपूते आणि मावस सासू नंदा विसपूते अशांकडून होत होता.
त्यानंतर सदर विवाहिता ही चाळीसगांवी आई-वडीलांकडे रहाते. या दरम्यान तिने शहर पोलीसांत वरील सहाही जणांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरुन कलम ४९८ अ, ४०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.






