स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता केली व्यक्त-श्री.संदीप दादा बेडसे

दोंडाईचा (संतोष कोळी) – देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक लढाईची सुरुवात ९ ऑगस्ट १९४२ या क्रांतिदिनी झाली. महात्मा गांधीजींनी इंग्रजांना ‘चले जाव’ सांगितले आणि देशवासियांना ‘करेंगे या मरेंगे’चा संदेश दिला. महात्मा गांधींजींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या त्या निर्णायक आंदोलनानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्या ऐतिहासिक दिवसाचे, ९ ऑगस्ट क्रांतिदिनाचे स्मरण करुन श्री संदीप दादा बेडसे यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शहिद झालेल्या वीर सैनिकांना आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
९ ऑगस्ट १९४२ ला आपल्या पूर्वजांनी इंग्रजांपासून मुक्तीचा लढा तीव्र केला होता. आज ९ ऑगस्ट २०२० ला आपल्याला शिंदखेडा तालुक्यासह धुळे जिल्हा कोरोनापासून मुक्तीचा लढा तीव्र करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करुया. यंदाचा ऑगस्ट क्रांतीदिन हा कोरोनामुक्तीच्या निर्णायक लढ्याची सुरुवात ठरेल, असा विश्वासही श्री संदीप दादा बेडसें यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष श्री संदीप त्रंबकराव बेडसे, श्री.दुर्गेश पाटील युवक जिल्हा उपाध्यक्ष, कमलाकर बागले युवक जिल्हा कार्याध्यक्ष, चिराग माळी युवक तालुकाध्यक्ष, दौला भाया, सुभाष वाघ माजी सरपंच साळवे, हिरालाल आबा, ज्ञानेश्वर पाटील माजी सरपंच साळवे, बंटी दादा उपसरपंच धमाणे,दीपक जगताप माजी उपसरपंच हातनुर,यश आखाडे तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here