घरातील दोन नोकरांनी पळवले एक लाख १० हजारांचे दागिने

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : पिंपळे सौदागर येथील रोजलँड सोसायटीमधील एका घरात काम करणा-या दोन नोकरांनी मिळून एक लाख १० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १२) सकाळी साडेआठ ते रात्री साडेदहा वाजताच्या कालावधीत घडली.

प्रवीण जगताप (रा. जगताप डेअरी जवळ, पिंपळे सौदागर) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सव्वाआठ ते रात्री साडेदहा वाजताच्या कालावधीत आरोपींनी फिर्यादी यांच्या घरातून एक लाख दहा हजार रुप्ये किमतीचे १५.६८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सांगवी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here