जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : धरणगाव येथील प.रा.विद्यालयाचे इंग्रजी शिक्षक गणेश सूर्यवंशी यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या धरणगाव शहर शिवसेना परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ऑनलाइन प्रशिक्षण बद्दल त्यांना महाराष्ट्र समना परिषद तर्फे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्माननीय करण्यात आले त्यांच्या धरणगाव शिवसेना परिवारातर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शाल-श्रीफळ,बुके देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ,उद्योगपती सुरेश नाना चौधरी,क्षत्रीय ठाकूर समाजाचे अध्यक्ष जिवन आप्पा बयस,उपजिल्हा प्रमुख सकल मराठा समाजाचे जिल्हा अध्यक्ष पी एम पाटील,भानुदास आप्पा विसावे,नगराध्यक्ष निलेश चौधरी,बाळासाहेब जाधव,धीरेंद्र पुरभे,योगेश पी.पाटील,सतीश बोरसे,रवींद्र जाधव,कमलेश बोरसे आदी उपस्थित होते.






