आंबोलीजवळ हॉटेलवर पोलीसाची धाड; पार्टीत सुरु होता बारबालांचा डान्स

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोलीपासून जवळच असलेल्या एका हॉटेलवर सावंतवाडीचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक नितीन काटेकर याच्या पथकाकडून धाड टाकण्यात आली. यात कर्नाटक येथील एका कंपनीच्या पार्टीत चक्क बारबाला डान्स करत असल्याचे समोर आले आहे. यावेळी मोठ्याप्रमाणात मद्यसाठाही तेथे आढळून आला. कारवाई सोमवारी रात्री उशिरा करण्यात आली असून सावंतवाडी पोलीसांना अंधारात ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे.

आंबोलीच्या जवळच एक हॉटेल असून तेथे कर्नाटकातील एका कंपनीच्या अधिकाऱ्यांची मोठी पार्टी होती जवळपास कंपनीचे तीस अधिकारी या पार्टीत सहभागी झाले होते मोठ्याप्रमाणात मद्यसाठा ही होता. तसेच काही मुली या पार्टीत डान्स करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीसांनी धाड टाकल्यानंतर कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान या कारवाईबाबत स्थानिक पोलीसांना अंधारात ठेवण्यात आले असून पोलीस उपअधीक्षक काटेकर यांनी सावंतवाडी आंबोली या मार्गाने न जाता दुसऱ्याच मार्गाने जाऊन ही कारवाई केली आहे.जेणे करून या कारवाईची वाच्यता बाहेर होऊ नये, म्हणून हा मार्ग बदलण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here