चोरट्यांचा भरदिवसा महिलेच्या दागिन्यांवर डल्ला

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथे एका ज्येष्ठ महिलेला चार जणांनी बोलण्यात गुंतवून तिचे दागिने लंपास केल्याचा प्रकार वानवडीतील चायना ग्रील रेस्टॉरंट जवळ मंगळवारी (दि.२३) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी वानवडीतील जांभुळकर गार्डन येथील ६० वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या सकाळी साडेअकराच्या सुमारास पायी घरी जात होत्या. त्यावेळी चौघे जण त्यांच्याजवळ आले. मॅडम पुढे एका महिलेला मारहाण झाली आहे, तिचे सर्व दागिने काढून घेतले आहेत. तुमचे दागिने काढून ठेवा असे सांगितले.

फिर्यादी यांनी त्यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवल्या असता, मॅडम बघु तुम्ही दागिने नीट ठेवले का असे म्हणत चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतून त्यांची नजर चूकवून ६० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या लांबविल्या. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here